Posts

Showing posts from 2020

The Incredible story of Alvarenga- Who Survived 438 Days Adrift In The Pacific.

*जोस साल्वादोर अल्वारेन्गा* काही घटना ह्या अविश्वसनीय आणि माणसाच्या जीवनसंघर्षाची परिसीमा गाठणाऱ्या असतात. अत्यन्त प्रतिकूल अशा परिस्थितीत किंवा ज्या ठिकाणी सर्व उपाय खुंटलेले आहेत आता आपले अस्तित्व पुढे टिकवून ठेवणे, जगणे अशक्य आहे अशा प्रसंगांमधून जेव्हा माणसे जिवंत परत येतात आणि सामान्य जीवन जगतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. जोस अल्वारेंगा या मच्छीमाराची कथा अशीच आहे.             एका मेक्सिकन मच्छिमाराची बोट समुद्रामध्ये भरकटल्यानंतर तो चक्क ४३८ दिवस जिवंत राहिला. ह्या दरम्यान त्याच्या जवळ खाण्यापिण्यासाठी होते फक्त कासव, समुद्रपक्षी, मासे, पावसाचे पाणी आणि स्वतःचे मूत्र! जोस अल्वारेंगा हा अनुभवी मच्छिमार होता. त्याने आपल्या आयुष्याची कित्येक वर्षे समुद्रामध्ये मासेमारी करण्यात घालविली होती. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी तो कॉर्डोबा नावाच्या एका नवशिक्या सहकाऱ्यासोबत बोट घेऊन प्रशांत महासागरामध्ये मासे पकडण्यासाठी निघाला. ह्या दोघांनी पुढच्या २-३ दिवसांसाठी लागणारी सामग्री बरोबर घेतली होती. मासेमारीला सुरुवात करून अवघे काही तासातच त्यांनी ५००...

दरबारी लेखांवर असलेला फारसी भाषेचा प्रभाव

*दरबारी लेखांवर असलेला फारसी भाषेचा प्रभाव.* दरबारी लिहिण्यांत, मुसलमानांचें राज्य चालू असताना इ. स. १६२८ मध्ये १४% शब्द मराठी येत; शिवाजी महाराजांचें स्वराज्य चालू असतां इ. स. १६७७ मध्ये ६२% शब्द मराठी येत, आणि शाहू महाराज राज्यावर असतां इ. स. १७२८ मध्ये ९३% शब्द मराठी येऊ लागले. परराज्याचा भाषेवरती केवढा परिणाम होतो त्याचा हा रोखठोक ताळा आहे! १६२८-१७२८ या १०० वर्षात दरबारी लेखांमधील मराठी शब्दांची टक्केवारी १४% वरून ९३% वर गेली. इ स १५५० च्या अगोदरचे म्हणजे इ. स. १४९५, १४७१, १४१६ सालच्या दरबारी फारशी-मराठी लेखांत फारशी शब्द बरेच आढळतात. जेथे जेथे म्हणून मुसुलमानांचें राज्य कायम झाले होते, तेथे तेथे दरबारांतील सर्व मराठी लिहिण्यांत फारशी शब्दांचा भरणा विशेष असे. दरबारापासून दूर अशा गावीं व सरकारी अधिका-यांचा जेथें संबंध नाहीं अशा गांवकीच्या किंवा धर्माच्या किंवा गोतकीच्या खटल्यांत जे कागदपत्र होत, त्यांत फारशी शब्दांचीं संख्या कमी असे. परंतु त्यांतहि फारशी शब्द बिलकुल नसत अशी मात्र गोष्ट नव्हती. इ. स. १४१६ च्या सुमारास मुसुलमानांचें राज्य महाराष्ट्रांत होऊन बराबर ९८ वर्षे झाल...

99 क्लब मेंबर

*छानसं पुन्हा पुन्हा वाचाव अस*      आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. सर्व ऐशोआराम, सुख पायाशी लोळत असूनही तो नेहमीच चिंतेत असायचा.त्याला समाधान असे कधीच वाटले नाही. एके दिवशी असाच विचार करत असतांना त्याचे लक्ष एका नोकराकडे गेले.काम करीत असतांना तो स्वतःशीच छानस गाण गुणगुणत होता.त्याचा सदोदित आनंदी चेहरा पाहून राजाला आश्चर्य वाटले.राजा विचार करू लागला, " मी एवढा सार्वभौम राजा असुनही समाधानी,आनंदी नाही आणि हा माझा यत्ःकिचीत नोकर मात्र एवढा प्रफुल्लित, आनंदी कसा ?"      राजाने नोकराला विचारले," तू एवढा आनंदित कसा काय राहतोस ?"     नोकर उद्गारला," महाराज !  मी आपला एक मामूली नोकर .माझ्या कुटूंबाच्या गरजा फारच थोड्या आहेत. मला फक्त डोक्यावर छप्पर आणि पोट भरण्यासाठी गरमागरम अन्न असले म्हणजे पूरे ! "      राजा विचारात पडला व आपल्या अत्यंत विश्वासू प्रधानास ही गोष्ट सांगितली.      सर्व वृत्तांत ऐकल्यावर प्रधान म्हणाला," हे राजन्, हा नोकर अद्याप " ९९ -क्लब " चा मेंबर झालेला नाही म्हणून तो अत्यंत आनंदात आहे." ...