99 क्लब मेंबर
*छानसं पुन्हा पुन्हा वाचाव अस*
आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. सर्व ऐशोआराम, सुख पायाशी लोळत असूनही तो नेहमीच चिंतेत असायचा.त्याला समाधान असे कधीच वाटले नाही. एके दिवशी असाच विचार करत असतांना त्याचे लक्ष एका नोकराकडे गेले.काम करीत असतांना तो स्वतःशीच छानस गाण गुणगुणत होता.त्याचा सदोदित आनंदी चेहरा पाहून राजाला आश्चर्य वाटले.राजा विचार करू लागला, " मी एवढा सार्वभौम राजा असुनही समाधानी,आनंदी नाही आणि हा माझा यत्ःकिचीत नोकर मात्र एवढा प्रफुल्लित, आनंदी कसा ?"
राजाने नोकराला विचारले," तू एवढा आनंदित कसा काय राहतोस ?"
नोकर उद्गारला," महाराज ! मी आपला एक मामूली नोकर .माझ्या कुटूंबाच्या गरजा फारच थोड्या आहेत. मला फक्त डोक्यावर छप्पर आणि पोट भरण्यासाठी गरमागरम अन्न असले म्हणजे पूरे ! "
राजा विचारात पडला व आपल्या अत्यंत विश्वासू प्रधानास ही गोष्ट सांगितली.
सर्व वृत्तांत ऐकल्यावर प्रधान म्हणाला," हे राजन्, हा नोकर अद्याप " ९९ -क्लब " चा मेंबर झालेला नाही म्हणून तो अत्यंत आनंदात आहे."
राजाने। विचारले," ९९- क्लब " ही काय भानगड आहे ?
प्रधान उत्तरला, " राजन् ! "९९-क्लब" म्हणजे काय पाहायचे असेल तर ९९ सुवर्णमुद्रा एका बँगेत भरून ती बँग ह्या नोकराच्या घराच्या दरवाजाच्या पायरीवर ठेवून द्या व गंमत पहा ! "
राजाने तसा आदेश प्रधानास दिला.प्रधानाने ९९ सुवर्णमुद्रा भरलेली पिशवी नोकराच्या दारी ठेवून दिली. सकाळी नोकर सुवर्णमुद्रा भरलेली पिशवी आपल्या दारात पाहून अतिशय आनंदित झाला. तो जोराने ओरडला," एवढ्या सुवर्णमुद्रा ? " असे म्हणून तो सुवर्णमुद्रा मोजू लागला. बर्याच वेळा मोजूनही त्या बरोबर ९९ च भरल्या .त्याला खूप आश्चर्य वाटले. तो मनांतल्या मनांत म्हणाला,' ती शेवटची मुद्रा काय झाली असेल ? नक्कीच ९९ सुवर्णमुद्रा कुणीही अशा सोडणार नाही '
त्याने सर्वदूर शोधले पण ती एक सुवर्णमुद्रा काही त्याला सापडली नाही. शेवटी त्याने असा विचार केला,"असू दे ,मी खूप कष्ट करेन व ती १०० वी मुद्रा मिळवेनच ! "
त्या दिवसापासून तो नोकर अमुलाग्र बदलला .तो ओव्हरटाईम करू लागला.चिडचिड करू लागला .आपल्या कुटुंबाला दोष देऊ लागला की ते शंभर मुद्रा कमवण्यासाठी काहीच मदत करीत नाहीत.
अशा प्रकारे त्याने गाणे म्हणणे सुध्दा बंद केले.
नोकरामधील हा नाट्यमय बदल पाहात असता राजा बुचकळ्यात पडला.तेंव्हा प्रधान म्हणाला," हे राजन ! हा नोकर आता विधिवत् ९९-क्लबचा मेंबर झालेला आहे ! '
" ९९-क्लब " हे नांव अशा लोकांना दिले जाते,ज्यांच्याकडे आनंदी जीवन जगण्यापुरते धन तर असते पण त्यांची हाव अधिकची असते.हा अधिकचा १ आणखी कमावण्यासाठी ते जीवाचे रान करतात ! आणखी हवे....आणखी हवे....या हव्यासापोटी जीवनातील आनंद मात्र घालवतात.
आपल्या आयुष्यात गरजेपुरते धन मिळते तेव्हा आपण सुखी समाधानी असतो मात्र ज्याक्षणी थोडेसे सुध्दां जास्त मिळते त्या क्षणापासून अजून जास्त...अजून जास्त ...मिळण्यासाठी आपण त्यामागे धावतो .
आपल्या वाढत्या गरजा भागवणेसाठी,लक्झरी जीवनातील ईच्छापुर्ती करण्यासाठी जास्त काम करावे लागते, आपली झोप उडते, आनंद नष्ट होतो व हे कुचक्र सुरू होते.
तेव्हा असा हा " ९९-क्लब '"......
याला मेंबर होण्यासाठी काहीही फी नाही परंतु जीवनभर त्याच्या मागे धावतांना जी किंमत मोजावी लागते ती जीवनातील सर्व आनंद नष्ट करते .
म्हणून वेळीच सावधान व्हा !!!
*आपलाच एक हीतचींतक...*

Comments