दरबारी लेखांवर असलेला फारसी भाषेचा प्रभाव
*दरबारी लेखांवर असलेला फारसी भाषेचा प्रभाव.*
दरबारी लिहिण्यांत, मुसलमानांचें राज्य चालू असताना इ. स. १६२८ मध्ये १४% शब्द मराठी येत; शिवाजी महाराजांचें स्वराज्य चालू असतां इ. स. १६७७ मध्ये ६२% शब्द मराठी येत, आणि शाहू महाराज राज्यावर असतां इ. स. १७२८ मध्ये ९३% शब्द मराठी येऊ लागले. परराज्याचा भाषेवरती केवढा परिणाम होतो त्याचा हा रोखठोक ताळा आहे!
१६२८-१७२८ या १०० वर्षात दरबारी लेखांमधील मराठी शब्दांची टक्केवारी १४% वरून ९३% वर गेली.
इ स १५५० च्या अगोदरचे म्हणजे इ. स. १४९५, १४७१, १४१६ सालच्या दरबारी फारशी-मराठी लेखांत फारशी शब्द बरेच आढळतात. जेथे जेथे म्हणून मुसुलमानांचें राज्य कायम झाले होते, तेथे तेथे दरबारांतील सर्व मराठी लिहिण्यांत फारशी शब्दांचा भरणा विशेष असे.
दरबारापासून दूर अशा गावीं व सरकारी अधिका-यांचा जेथें संबंध नाहीं अशा गांवकीच्या किंवा धर्माच्या किंवा गोतकीच्या खटल्यांत जे कागदपत्र होत, त्यांत फारशी शब्दांचीं संख्या कमी असे. परंतु त्यांतहि फारशी शब्द बिलकुल नसत अशी मात्र गोष्ट नव्हती. इ. स. १४१६ च्या सुमारास मुसुलमानांचें राज्य महाराष्ट्रांत होऊन बराबर ९८ वर्षे झालीं होतीं व मुसुलमानी भाषेचा देशांत इतका प्रचंड संचार झाला होता कीं दरबारापासून अलिप्त राहणा-या मनुष्याच्याहि बोलण्यांत व लिहिण्यांत फारशी शब्द नकळत येत.
१२९० तील ज्ञानेश्वरींत एकही फारशी शब्द सापडत नाही. शिवाजी महाराजांच्या वेळच्या दरबारी लेखांतील भाषेचे परीक्षण करताना त्यातील फारशी शब्द व प्रयोग कसे व केव्हांपासून आले ह्या गोष्टींचा शोध लावण्याच्या उद्देशाने आपण ज्ञानेश्वरीपर्यंत येऊन ठेपलो. मराठी भाषेच्या शब्दरचनेंत व वाक्यरचनेत फारशी भाषेचे कार्य कोणतें, हा प्रस्तुत विवेचनाचा विषय असल्यामुळें ज्ञानेश्वरीच्या पलीकडे आपल्याला जाण्याची गरजच नाही.
१२९० तील ज्ञानेश्वरींत एकही फारशी शब्द सापडत नाहीं.
- (१) १२९० पर्यंत सर्व महाराष्ट्रांत, व १३९५ पर्यंत, कदाचित पुढेही काही काळ, महाराष्ट्राच्या ज्या भागांत स्वराज्य होते तेथे, शुद्ध निर्भेळ मराठी भाषा बोलण्यात व लिहिण्यात येत असे; (२) १२९० पासून १६५६ पर्यंत, म्हणजे शिवाजी महाराजांचा अंमल सुरू होईपर्यंत, फारशी शब्दांचें मराठीत प्राधान्य होते; (३) १६५६ पासून १७२८ पर्यंत फारशी शब्द जलद गतीने कमी होत गेले; आणि त्यापुढें (४) १७२८ पासून १८१८ पर्यंत मुसलमान संस्थानांशी झालेला पत्रव्यवहार व सरकारी दफ्तर ह्यांखेरीज इतरत्र फारशी शब्द फारसे उपयोगांत नव्हते; असे चार सिद्धान्त निष्पन्न झाले. त्यापैकी फारशीचा अप्रतिहृत प्रवेश मराठी भाषेंत १२९० पासून १६५६ पर्यंतच्या काळांत जोराने झाला. इ. स. १२९० पासून १३१८ पर्यंत महाराष्ट्रांत यादवांचेंच राज्य असल्यामुळें, फारशीचा प्रवेश मराठीत कांहींच झाला नसावा. १३१८ पासून मुसुलमानांकडे राज्याचीं सूत्रें गेल्यावर मात्र फारशी शब्द मराठींत येण्यास सुरुवात झाली व ह्या आगमनाची अखेर इ. स. १६५६ मध्ये झाली. म्हणजे सुमारें ३३८ वर्षे फारशीचें मराठीला निकट सान्निध्य होतें.
*संदर्भ - मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)*

Comments