The Incredible story of Alvarenga- Who Survived 438 Days Adrift In The Pacific.
*जोस साल्वादोर अल्वारेन्गा* काही घटना ह्या अविश्वसनीय आणि माणसाच्या जीवनसंघर्षाची परिसीमा गाठणाऱ्या असतात. अत्यन्त प्रतिकूल अशा परिस्थितीत किंवा ज्या ठिकाणी सर्व उपाय खुंटलेले आहेत आता आपले अस्तित्व पुढे टिकवून ठेवणे, जगणे अशक्य आहे अशा प्रसंगांमधून जेव्हा माणसे जिवंत परत येतात आणि सामान्य जीवन जगतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. जोस अल्वारेंगा या मच्छीमाराची कथा अशीच आहे. एका मेक्सिकन मच्छिमाराची बोट समुद्रामध्ये भरकटल्यानंतर तो चक्क ४३८ दिवस जिवंत राहिला. ह्या दरम्यान त्याच्या जवळ खाण्यापिण्यासाठी होते फक्त कासव, समुद्रपक्षी, मासे, पावसाचे पाणी आणि स्वतःचे मूत्र! जोस अल्वारेंगा हा अनुभवी मच्छिमार होता. त्याने आपल्या आयुष्याची कित्येक वर्षे समुद्रामध्ये मासेमारी करण्यात घालविली होती. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी तो कॉर्डोबा नावाच्या एका नवशिक्या सहकाऱ्यासोबत बोट घेऊन प्रशांत महासागरामध्ये मासे पकडण्यासाठी निघाला. ह्या दोघांनी पुढच्या २-३ दिवसांसाठी लागणारी सामग्री बरोबर घेतली होती. मासेमारीला सुरुवात करून अवघे काही तासातच त्यांनी ५००...